अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात (crime news) आता नवं वळण आलं आहे. सुशांतचा पोस्टमॉर्टम करणाऱ्या टीममधल्या एका कर्मचाऱ्याने मोठा दावा केला. कूपर रुग्णालयात जून 2020 मध्ये सुशांतचा पोस्टमॉर्टम करण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या शरीरावर कोणत्याच खुणा नव्हत्या, असं सांगण्यात आलं होतं.
मात्र आता कूपर रुग्णालयाचे मॉर्चुअरी स्टाफ मेंबर रुपकुमार शाह यांनी दावा केला की सुशांतची आत्महत्या नाही तर हत्याच होती. या धक्कादायक दाव्यानंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे रुपकुमार यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
रुपकुमार शाह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतायत, “जेव्हा सुशांतचा मृत्यू (crime news) झाला होता, तेव्हा आम्हाला कूपर रुग्णालयात पाच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मिळाले होते. त्यापैकी एक मृतदेह व्हीआयपी होता. जेव्हा आम्ही पोस्टमॉर्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला समजलं की तो मृतदेह सुशांतचा होता. त्याच्या शरीरावर बऱ्याच खुणा होत्या. गळ्यावरही दोन-तीन खुणा होत्या.”
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विट केलं. श्वेताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टॅग करत लिहिलं, ‘रुपकुमार शाह सुरक्षित राहतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सीबीआयने सुशांतच्या प्रकरणाचा वेळेत तपास करावा.’
‘यात थोडं जरी सत्य असेल तर आम्ही सीबीआयकडे विनंती करतो की त्यांनी याकडे लक्ष द्यावं. तुम्ही नि:पक्ष तपास करून सत्य सर्वांसमोर आणाल, यावर आम्हाला विश्वास आहे. याप्रकरणी अद्याप कोणताच निकाल न लागल्याने आम्हाला खूप वाईट वाटतंय’, असंही त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटलंय.
सुशांतच्या मृतदेहावरील (crime news) खुणांविषयी वरिष्ठांना सांगितलं असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आपण याविषयी नंतर बोलू, असं ते म्हणाल्याचा खुलासा रुपकुमार यांनी केली. 14 जून 2020 रोजा सुशांतचं निधन झालं होतं. मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
सुशांतच्या बहिणीचं ट्विट-
Roopkumar Shah a Cooper hospital Mumbai mortuary room employee claims that Sushant Singh Rajput was Murdered. He was present their during the Postmortem he claims.
HM of Maharashtra should provide him security immediately & make him connect with CBI @Dev_Fadnavis. pic.twitter.com/2DdMt8v3zb
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) December 26, 2022