मध्यरात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसून नववर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year) देणाऱ्या दोन प्रेमवीरांना चांगलाच प्रसाद मिळाला. एकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जगभरात नववर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. काहींनी घरी केक कापून नवीन वर्ष साजरे केले, तर काहींनी हिल स्टेशन गाठले.
अशा परिस्थितीत प्रियकर-प्रेयसीही नववर्ष स्वागताच्या उत्साहापासून दूर राहिले नाहीत. गुपचूप एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या, पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे काहींना चांगलेच अंगलट आले. असेच एक प्रकरण यूपीतील पिलीभीतमधून समोर आले आहे.
येथे एक प्रियकर प्रेयसीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year) देण्यासाठी तिच्या घरात घुसला. प्रेयसीला हॅप्पी न्यू बोलताना पाहून घरच्यांनी त्याला पकडून जागीच रिटर्न गिफ्ट दिले. प्रियकराची धुलाई करून कुटुंबीयांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी प्रियकराला पकडून पोलीस ठाण्यात आणले. असाच एक प्रकार बरेलीमधूनही समोर आला आहे. येथेही प्रियकर त्याच्या विवाहित प्रेयसीच्या घरात घुसला. घरच्यांनी त्याला पकडून जबर मार दिला.
हे प्रकरण पिलीभीत जिल्ह्यातील आहे. बिलसांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईटगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील तरुणाचे शेजारी राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते. दोघांचीही चर्चा गावात बराच काळ रंगत होती. रविवारी रात्री नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने प्रियकराने शेजारील प्रेयसीच्या घरात प्रवेश केला. नातेवाईकांना याची माहिती मिळाली. त्यांनी प्रियकराला जागीच पकडले. त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि प्रियकराला ताब्यात घेऊन ठाण्यात आले.
रामपूरच्या मिलक येथे राहणाऱ्या तरुणाने सांगितले की, त्याचे दूरच्या नातेवाईकाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते, मात्र मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न बारादरी येथील जोगी नावडा येथील तरुणाशी लावले. पण त्यांच्यातील प्रेमसंबंध कायम राहिले. शनिवारी रात्री तो आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Happy New Year) देण्यासाठी आला होता.
दरम्यान, पतीने तिला पाहून लहान भावाला बोलावून घेतले व तरुणावर तलवारीने वार केले. दरम्यान महिलेच्या दीराने म्हटले की, तरुण नशेत होता व तोच तलवार घेऊन आला होता. त्याला जाण्यास सांगितल्यावर त्याने त्याच्यावर व भावावर हल्ला करून जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.