आयसीसी महिला वर्ल्डकप (Cricket) स्पर्धेत आज भारताचा इंग्लंड विरुद्ध सामना होत आहे. भारतीय महिला संघाने मागचा वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना सहज जिंकला होता. आज इंग्लंड विरुद्ध त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या संघाचा संघर्ष सुरु आहे. इंग्लंडच्या महिला संघाला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. भारताने मागच्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला 155 धावांनी पराभूत केलं होतं. टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवायचा आहे.
त्याचबरोबर हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. या (Cricket) संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामने गमावले आहेत. इंग्लंडच्या संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकायचे असेल तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – डेनियाल व्याट, टॅमी ब्युमॉन्ट, हेदर नाइट, नताली सायव्हर, एमी अॅलन जोन्स, सोफिया डंक्ली, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टन, केट क्रोस, कॅरोलेट डीन, अन्या श्रबसोले
भारताची प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन – स्मृती मानधना, यस्तिका भाटिया, मिताली राज, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग आणि राजेश्वरी गायकवाड












