देशभरात मागील वर्षापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol) कोणताही बदल झालेल नाही, मात्र ही स्थिती आता लवकर बदलू शकते. याचे कारण असे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज यूपी आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमतीतील बदल दिसून येत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या किमती आजही स्थिर आहेत.
तर दुसरीकडे गौतम बुद्ध नगर येथे आज पेट्रोल 24 पैशांनी 97.00 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. तर डिझेल 21 पैशांनी वाढून 90.14 रुपये प्रति लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोल (Petrol) 2 पैशांनी स्वस्त होऊन 96.56 रुपयांवर पोहोचले. तर डिझेल 2 पैशांनी घसरून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 09-01-23
पाटणामध्ये पेट्रोल 35 पैशांनी घसरून 107.24 रुपये प्रति लिटर तर डिझेल 32 पैशांनी वाढून 94.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.तसेच गेल्या 24 तासांत कच्चा तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूडची किंमत $0.70 ने घसरून $79.27 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. त्याच वेळी, WTI ची किंमत प्रति बॅरल $ 0.63 ने घसरून $ 74.40 वर आली आहे.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
या शहरांमध्ये दर बदलले
- नोएडामध्ये पेट्रोल 97.00 रुपये आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर
- लखनौमध्ये पेट्रोल 96.36 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर
- पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.