Tuesday, June 24, 2025

तुम्ही Rent ने राहता का? तर अवश्य जाणून घ्या तुमचे अधिकार

सध्याच्या काळात घरांच्या किंमती या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे जोपर्यंत आपले स्वतःचे घर होत नाही. लोक हे भाड्याच्या (Rent) घरात राहतात. दुसरीकडे नोकरीच्या शोधात अनेकजण आपली घरे सोडून शहरांमध्ये येतात आणि भाड्याच्या घरात राहून आपले काम चालवतात. परंतु काहीवेळा घरमालक मनमानी पद्धतीने वागतात आणि भाडेकरूच्या असहायतेचा फायदा घेतात.

केव्हाही ते भाडेकरूंना भाडे वाढवण्यास सांगतात किंवा अचानक घर रिकामे करण्यास सांगतात. अशा स्थितीत भाडेकरूंचे टेंशन वाढते. तुम्हीही भाड्याने राहत असाल, तर तुम्हाला भाडेकरूच्या काही अधिकारांची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या मजबुरीचा कोणी गैरफायदा घेऊ शकणार नाही.

भाडेकरूचे हक्क

भाडे (Rent) करारामध्ये लिहिलेल्या कालमर्यादेपूर्वी घरमालक भाडेकरूला घरातून बाहेर काढू शकत नाही, असे कायदा सांगतो. भाडेकरूने 2 महिन्यांचे भाडे दिले नसेल किंवा त्याचे घर कॉमर्शियल कामासाठी किंवा अशा कोणत्याही कामासाठी वापरत असेल, ज्याचा भाडे करारात उल्लेख नाही, तर तो भाडेकरूला घर रिकामे करण्यास सांगू शकतो. मात्र या परिस्थितीतही घरमालकाला भाडेकरूला 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते.

घरमालकाला घराचे भाडे वाढवायचे असेल तर त्याने भाडेकरूला किमान तीन महिने अगोदर नोटीस द्यावी. भाडे अचानक वाढवता येणार नाही. याशिवाय घरमालकाकडून वीज कनेक्शन, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग यांसारख्या साध्या सुविधांची मागणी करणे हा भाडेकरूचा हक्क आहे. कोणताही घर मालक हे नाकारू शकत नाही.

रेंट अ‍ॅग्रीमेंटनंतर घराच्या रचनेला तडे गेल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी घरमालकाची आहे. परंतु जर घरमालक त्याचे नूतनीकरण करण्याच्या स्थितीत नसेल तर भाडेकरू (Rent) घराचे भाडे कमी करण्यास सांगू शकतो. कोणत्याही वादाविषयी, भाडेकरू रेंट अथॉरिटीकडे देखील संपर्क साधू शकतो.भाडेकरूचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, घरमालक त्याच्या कुटुंबाला घर रिकामे करण्यास सांगू शकत नाही. त्याला हवे असल्यास, तो उर्वरित कालावधीसाठी नवीन करार करू शकतो.

रेंट अ‍ॅग्रीमेंट लागू झाल्यानंतर कोणताही घरमालक पुन्हा पुन्हा डिस्‍टर्ब करु शकत नाही. जर घरमालकाला भाडेकरूच्या घरी कोणत्याही दुरुस्तीच्या कामासाठी किंवा इतर कामासाठी यायचे असेल तर त्याने भाडेकरूला किमान 24 तास अगोदर लेखी सूचना देऊन कळवावे.

तसेच भाडेकरू (Rent) घरात नसेल तर घरमालक त्याच्या घराची कुलूप तोडू शकत नाही. तसेच त्याचे सामान बाहेर काढू शकत नाही.भाडेकरूला भाडे भरण्यासाठी दरमहा पावती घेण्याचा अधिकार आहे. जर घरमालकाने भाडेकरूला मुदतीपूर्वी बेदखल केले तर ती पावती न्यायालयात पुरावा म्हणून दाखवली जाऊ शकते.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म