Sunday, June 22, 2025

Cricket रोहित शर्मा आणि विराट कोहली आता तुम्ही…; टीम इंडियातून आली मोठी बातमी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी तिसरी आणि अखेरची वनडे (Cricket) होणार आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन मॅच जिंकून मालिका खिशात घातली आहे. अशात अखेरच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, या वर्षी भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे आणि त्यासाठी अंतिम संघ निश्चित करण्यासाठी युवा खेळाडूंना मैदानावर उतरवण्याची ही चांगली संधी आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची दुसरी वनडे जिंकल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी असा सल्ला दिला की, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी तिसरी वनडे खेळू नये. क्रिकेट एक्सपर्ट्स आणि माजी खेळाडूच्या मते या दोघांच्या जागी अन्य खेळाडूंना संधी आहे. उद्या इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल होऊ शकतो. ज्या खेळाडूंना आतापर्यंत संधी मिळाली नाही त्यांना अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकते.

हे वाचा : तुम्ही Rent ने राहता का? तर अवश्य जाणून घ्या तुमचे अधिकार

भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू  (Cricket) वसीम जाफर आणि अन्य काही दिग्गजांनी विराट आणि रोहितला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या वनडे सामन्याच्या जागी त्यांनी रणजी ट्रॉफी किंवा अन्य कोणती तरी मॅच खेळावी. असा सल्ला देण्याचे महत्त्वाचा कारण म्हणजे भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

या मालिकेच्या तयारीसाठी रोहित, विराट यांनी रणजी खेळण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून संघातील सर्वात अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करण्यासाठी तयार होतील.न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी जर रोहित, विराट, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सीराज यांना विश्रांती दिली गेली तर संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले जाऊ शकते.

विराटच्या जागी रजत पाटीदारला स्थान मिळेल. गोलंदाजांमध्ये (Cricket) युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक यांना अद्याप संधी मिळाली नाही.दोन्ही संघात वनडे मालिकेनंतर ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या लढती २७ जानेवारी, २९ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी होईल.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म