Saturday, April 19, 2025

भारतात कधी येऊ शकते Corona Virus ची चौथी लाट?, तज्ज्ञ म्हणाले…

दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसनं (Virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. Omicron च्या सब व्हेरिएंट BA2 मुळे दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि युरोपातील  अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान भारतातील परिस्थिती पाहिली तर येथील चौथ्या लाटेबद्दल तज्ज्ञ फारसे चिंतित दिसत नाहीत. यासाठी, ते लसीकरण आणि प्रतिकारशक्ती यासह अनेक कारणांचा विचार करत आहे. सध्या देशात काही दिवसांपासून संसर्गाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 3 हजारांपेक्षा कमी आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारचे तांत्रिक सल्लागार आणि आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणतात, आपण सावधगिरी कमी करु शकत नाही, कारण जगभरात घडत आहे, त्यानुसार भारतात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. चौथ्या लाटेबद्दल आपल्याला एक गोष्ट माहित नाही की ती कधी येईल आणि ती किती धोकादायक असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी दरम्यान तिसर्‍या लाटेत वाढलेली प्रतिकारशक्ती आणि बहुतेक राज्यांमध्ये चांगले लसीकरण झाल्यामुळे, सध्या नवीन लाटेबद्दल तज्ज्ञांमध्ये कमी चिंता आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात त्रास झाला. मात्र, काही काळानंतर हे स्पष्ट झाले की, या वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटमुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. लसीकरणामुळे असं घडल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचा भाग असलेले डॉ शशांक जोशी यांनी मुंबईतील कोरोना व्हायरस (Virus) परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, जीनोम सिक्वेन्सिंगमुळे, आमच्या लक्षात आलं की ओमायक्रॉनचे व्हेरिएंट BA1 आणि BA2 तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासूनच येथे उपस्थित आहेत. दरम्यान भारतात सध्या नव्या लाटेचा धोका नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी माहिती दिली की, ‘BA2 भारतात आहे. नवीन इस्रायली व्हेरिएंट चिंतेचा प्रकार मानला जात नाही, म्हणून नवीन VoC बाहेर येईपर्यंत, येथे काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान आपण मास्क घालणं थांबवू नये. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, SARS-CoV-2 व्हायरस (Virus) अँटीबॉडीज कमी होताच लोकांना पुन्हा संक्रमित करू शकतो.
Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म