Sunday, April 20, 2025

Hororscope : या’ राशींना मिळणार GOOD NEWS; तुमची रास आहे का पाहा

Hororscope – सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 मार्च 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष 

आळस आणि चालढकलपणा पुन्हा वाढीला लागेल. हातातल्या कामात उगाचच वेळ काढाल. तुम्ही अचानक शॉपिंग किंवा विंडो शॉपिंगमध्येही गुंताल. एकंदर विचार करता दिवसाची ऊर्जा थोडीशी विस्कळीत दिसते.

वृषभ 

खास आणि जवळच्या नात्यांवर सातत्याने काम करावं लागतं. हे प्रयत्न अधिक वेळा दिसण्याची गरज तुमच्या जोडीदाराला वाटू शकते. प्रवाह तुमच्या विरोधात असेल, तर काही वेळा बाजूला राहणं श्रेयस्कर असतं. कामाच्या तासांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या.

मिथुन

कामाच्या ठिकाणी एखादी नवी व्यक्ती जॉइन होईल आणि तुमचा कामाचा ताण कमी होईल. ही गुड न्यूज आहे. कारण तुम्हाला स्पेस मिळेल आणि तुमच्या कामाचा वेगही वाढेल. आता नियोजन करण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळी रिमाइंडर दिल्यास अतिरिक्त कामापासून सुटका होऊ शकते. एखाद्या स्पोर्टिंग अ‍ॅक्टिव्हिटीमुळेसुद्धा अधिक ऊर्जा मिळू शकते.

कर्क 

कितीही बिझी असलात, तरीही तुमच्या कुटुंबाशी टचमध्ये राहिलात तर संतुलन साधलं जाईल आणि तुमचे पाय जमिनीवर राहतील. वेलनेस अ‍ॅक्टिव्हिटीमुळे आध्यात्मिक उपयोग होईल असं दिसतं. लीडरशिप आणि कोलॅबोरेशनची संधी लवकरच येत आहे.

सिंह 

तुम्ही पूर्वी कोणाला दुखावलं असेल, तर त्यांनी तुम्हाला कदाचित अजूनही माफ केलेलं नाही. बदल घडवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करा. भांडण-मतभेद मिटवण्यासाठी हा चांगला काळ ठरू शकतो. जवळचे मित्र शॉर्ट ट्रिप प्लॅन करू शकतील. गोड खाण्याचा योग आहे.

कन्या 

एखाद्या पॉप्युलर व्यक्तीचं तुमच्या कामाकडे लक्ष वेधलं जाईल आणि ती तुमच्याशी संपर्क साधेल. एका रेफरन्सच्या माध्यमातून ती व्यक्ती तुमच्याकडे येईल. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला स्वतःलाच काही शंका निर्माण झालेली असतानाच्या काळात हे घडेल. तुमच्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्या.

तूळ 

एरव्ही अगदी शांत असलेलं तुमच्या कामाच्या ठिकाणचं वातावरण अगदी किरकोळ कारणामुळे आणि योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे बिघडेल. नियोजनात नसलेलं एखादं अतिरिक्त काम तुम्हाला मिळू शकेल. मनोरंजनाचं एखादं नवं साधन तुमचं लक्ष विचलित करील. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

कामाच्या ठिकाणी निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा. आत्ता तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह झालात, तर तुम्हाला नंतरसाठी फायद्याचं ठरेल. शेजारी काही गोंधळ निर्माण होऊ शकतो. प्रेमप्रकरणात प्रगती होऊ शकते.

धनू 

लवकरच एखादी गुड न्यूज मिळू शकते. दिवस एकसुरी आणि संथ असेल; मात्र त्यात लवकरच बदल होईल. लवकर दमाल आणि झोपाल. लाँग डिस्टन्स संवादांमध्ये गुंताल.

मकर

पार्टनरशिप किंवा कोलॅबोरेशनच्या नव्या संधीसाठी तयारीत राहा. पुढचा रस्ता स्पष्ट दिसत असेल, तरीही अगदी बारीक-सारीक डिटेल्स लक्षात घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या हाताखालची व्यक्ती मार्गदर्शक सूचनांनुसार वागणार नाही.

कुंभ 

घडणाऱ्या गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्यास तयार असाल, तर आजचा दिवस अगदी सुलभ असेल. दमायला होणं स्वाभाविक आहे. थोडी विश्रांती, ब्रेक घ्या. एखाद्या कामाचं मूल्यमापन करताना तुमच्या फॅक्ट्स योग्य आहेत ना हे तपासून घ्या. एकसुरीपणा लवकरच मोडून काढाल.

मीन 

तुमच्या एखाद्या चांगल्या मित्राला कौटुंबिक कारणांसाठी कदाचित गरज लागू शकेल. फारसं ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीवर खूप टीका करू नका. बचत केलेल्या पैशांचा आता चांगला उपयोग होईल. निर्णयक्षमता विकसित होण्यासाठी थोडी प्रॅक्टिस आवश्यक आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म