Maha Shivratri नागपुरात आहे राज्यातील सर्वात उंच शिवमूर्ती, पाहा तिथं कसा होणार उत्सव?

महाशिवरात्रीच्या मंगलपर्वानिमित्त देशभारतील सर्व शिव मंदिरे आकर्षक पद्धतीने सजली आहेत. नागपूर शहरातील नंदनवन भागात असलेली 51 फुटी उभी शंकराची मूर्ती ही केवळ नागपुरातीलचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उंच शंकराची मूर्ती आहे. महाशिवारात्रीच्यानिमित्तानं या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. त्याचबरोबर हे मंदिर हे अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.

यंदा काय आकर्षण?

आदि आणि अनंताची महादेवता अशी महाशिवाची (Maha Shivratri) ओळख आहे. नागपूर शहराला गोंड राजवटीसह भोसलेकालिन प्राचीन इतिहास लाभला आहे. या शहरात देखील अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक शिव मंदिरं आहेत. त्याचबरोबर एक पुरातन शिव मंदिर शहराच्या नंदनवन भागात आहे.

हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 18-02-23

याच मंदिराच्या शेजारी 51 फूट उभ्या स्वरूपाची भव्य अशी विलोभनीय मूर्ती आहे. ही मूर्ती ही संपूर्ण महाराष्ट्रातील उंच मूर्ती असल्याचं मानलं जातं. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी होते. लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात.

नागपुरातूनच नव्हे तर नागपुराच्या बाहेरून देखील भाविक इथं दर्शनासाठी येतात. आम्ही दरवर्षी लघु रुद्राभिषेकचे आयोजन केले आहे. यासाठी सर्व समाजतील लोक येथे येऊन सक्रिय सहभाग नोंदवत असतात. यंदा आम्ही 251 विवाहित जोडप्यांचे लक्ष रुद्राभिषेकाचे (Maha Shivratri) ठेवले आहे.ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी उभ्या स्वरूपाची शंकराची मूर्ती असल्याने विशेष आकर्षण आहे.भाविकांनी देखील दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्ष्मनारायण सेवा समितीचे डॉ. निलेश गायधने यांनी व्यक्त केले आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म