लॉकडाऊनमुळे अवघं मनोरंजन विश्व आता ओटीटीच्या (OTT) दिशेने वळताना दिसत आहे. एक दोन नव्हे, तर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यातीलचा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स. जगभरात पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून नेटफ्लिक्स प्रसिद्ध आहे.
तर, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील कंटेंटमुळे करोडो लोक या ओटीटी प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने त्यांचे सबस्क्रिप्शन दर आणखी कमी केले आहेत.काहीच महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सने भारतातील सबस्क्रिप्शन दर कमी केले होते.
तर, आता नेटफ्लिक्सचे (OTT) नवे दर भारतात नव्हे, तर मध्य पूर्व देशांमध्ये स्वस्त झाले आहेत. या भागात कंपनीला त्यांचे युजर्स वाढवायचे आहेत. यासाठी त्यांनी आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये जवळपास ४०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. नेटफ्लिक्सकडून सध्या अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत.
हे वाचा : लॅपटॉप स्लो चालतोय? स्पीड वाढवण्यासाठी आजच फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
नेटफ्लिक्सचे हे नवे प्लॅन्स वेगवेगळ्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह ऑफर केले जात आहेत.नेटफ्लिक्सने येमेन, इराक, ट्युनिशिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन, लिबिया, अल्जेरिया, लेबनॉन, इराक, सुदान यांसारख्या मध्य पूर्व देशांमध्ये नेटफ्लिक्स प्लॅन स्वस्त केले आहेत.
या देशांमध्ये, नेटफ्लिक्सचा मूळ प्लॅन ७.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६६१ रुपयांना होता., ज्याची किंमत आता ३ डॉलर म्हणजेच २४८ रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल ४०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर, प्रीमियम प्लॅनमध्ये देखील दर कमी झाले आहेत. प्रीमियम प्लॅन ११.९९ डॉलरवरून ९.९९ डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे.