शेअऱ बाजारात स्टाॅक्स खरेदी (Stock Market) करुन होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना उच्च परताव्यासह डिव्हिडंट, बोनस शेअर्स, राईट्स इश्यूचा फायदा मिळतो. शेअर इंडियाच्या गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे.कोणत्याही चांगल्या स्टाॅकवर पोझीशन बनवणाऱ्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंट, बोनस शेअर्स, राईट्स इश्यूचा फायदा वेळोवेळी मिळत राहतो.
असाच एक स्टाॅक शेअर इंडिया सिक्योरिटीजचा आहे. कंपनीच्या पोझीशनल गुंतवणूकदरांसाठी ही चांगली बातमी आहे. शेअर इंडियाच्या बोर्डाने राईट्स इश्यूसाठी परवानगी दिली आहे. याचाच अर्थ, गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा ५०० रुपये स्वस्त दराने शेअर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
हे वाचा : आयपीएलपूर्वी Mumbai Indians ला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर
शेअऱ इंडिया (Stock Market) ही स्माॅल कॅप कंपनी आहे. कंपनीने २८ फेब्रुवारी २०२३ ला रेकाॅर्ड डेट निश्चित केली आहे. शेअर इंडियाच्या संचालक मंडळाने या शेअर्सच्या राईट्स इश्यूसाठी भाव ७०० रुपये निश्चित केला आहे. सोमवारी शेअर इंडियाच्या एका स्टाॅकचा भाव २.५४ टक्के तेजीसह १२१४.९० रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. योग्य गुंतवणूकदार राईट्स इश्यूच्या माध्यमातून ५०० रुपये प्रती शेअर्स वाचवू शकणार आहेत.
स्टाॅक एक्सेंजला (Stock Market) मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने ५० शेअर्सवर १ शेअर आणि १७ डिटॅचेबल वाॅरंटला संचालक मंडळाने परवानगी दिली आहे. कंपनीचा राईट्स इश्यू ९ मार्चला खुला होत आहे. तर १७ मार्चला बंद होत आहे. शेअर्स बाजारात कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ११.३३ टक्के रिटर्न्स दिले आहेत. दरम्यान या वर्षात हा स्टाॅक ०.८७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.