Saturday, June 21, 2025

SIP चा छप्परफाड परतावा; दरमहा १५ हजार रुपयांची बचत! पाहा कसं?

म्युच्युअल फंडातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी वेळेत आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. मात्र, तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूकीची सवय करावी लागेल. म्युच्युअल फंडात लवकर गुंतवणूक सुरू करून तुम्हाला चांगला फायदा होईल शकतो, विशेषत: निवृत्तीसाठी बचत करताना. पण सेवानिवृत्तीसाठी बचत केल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो याची गणना समजून घेण्याआधी, पहिले SIP म्हणजे काय आणि ते कसे काम करते, ते जाणून घेऊया.

बाजारातील अनेक तज्ञ गुंतवणुकीचा सल्ला देताना SIP करण्याचा सल्ला देतात. दरमहा एक ठराविक रक्कम एखाद्या फंडात गुंतवल्यास त्याचा काही वर्षांनी चांगला परतावा मिळू शकतो, असे गुंतवणूक तज्ज्ञ म्हणतात. पण अनेकांचा असा समज आहे की मोठा फंड तयार करण्यासाठी मोठी गुंतवणूक  करण्याची गरज आहे, पण तसे नाही. एसआयपीच्या माध्यमातून काही हजारांची गुंतवणूक देखील तुम्हाला कोट्याधीश करू शकते.

SIP म्हणजे काय?

पद्धतशीर गुंतवणूक योजना  ही गुंतवणुकीची एक पद्धत आहे. अनेक म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूकदार यामध्ये छोटी, नियमित किंवा मोठी गुंतवणूक करू शकतात. सामान्यतः गुंतवणूक साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक आधारावर केली जाते. आता एसआयपी कसे काम करते याबद्दल बोलायचे तर ते पूर्वनिर्धारित अंतराने निश्चित गुंतवणूक करून काम करते. याद्वारे गुंतवणूकदार कोणत्याही हालचालीशिवाय आणि बाजाराला वेळ न देता गुंतवणूक करू शकतो.

हे वाचा : आम्हीच शिवसेना, शिंदे गटाच्या वकिलाचा थेट सुप्रीम कोर्टात दावा; कोर्टात घटनाक्रमच सांगितला

एसआयपीचे गणित

उदाहरणाने समजायचे तर १२% परतावा गृहीत धरल्यास वयाच्या ६०व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यावर जर तुम्हाला हातात १० कोटी रुपयाचा फंड हवा असेल तर यासाठी तुमहाला वयाच्या २०व्या वर्षापासून दरमहा केवळ ८४१६ रुपये गुंतवावे लागतील. अशाप्रकारे तुमहाला मॅच्युरिटीवर १० कोटी रुपये मिळतील. याशिवाय जर तुम्ही २५व्या वर्षी गुंतवणूक सुरु केल्यास तुम्हाला दरमहा १५,३९६ रुपये SIP गुंतवणूक करावी लागेल, जेणेकरून तुम्हाला निवृत्तीवर १० कोटी रुपये मिळतील.

टीप : वरील तपशील फक्त माहितीसाठी आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा, आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या. कारण  गुंतवणूक जोखीमपूर्ण असते..

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म