आजकाल स्मार्टफोन (Smart Phone) हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तेही विशेषत: मुलांसाठी. तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या वडिलांनी तुमचा फोन हिसकावून घेतला तर तुम्ही काय कराल? फोन बाजूला ठेवून तुम्ही वाचायला सुरुवात कराल, हे उघड आहे. पण हल्ली सगळीच मुलं एवढी हट्टी झाली आहेत की स्वतःचा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी ते काहीही करायला तयार होतात.
कधी कधी तर यामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात वडिलांनी फोन आणि आयपॅड हिसकावलं तेव्हा मुलाला इतका राग आला की त्याने 17 व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रय़त्न केला आणि मग अचानक त्याचा हात सुटला…
हा व्हिडिओ सिंगापूरचा आहे. ही आधीच घडली होती पण आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा खिडकीतून बाहेर निघाल्याचं दिसत आहे. असं दिसतं की तो आता उडी मारणार आहे. तो स्टंट करतो. आयफोन (Smart Phone) आणि आयपॅड परत न केल्यास तो उडी मारून आत्महत्या करेल, अशी धमकी त्याच्या पालकांना देतो. सुदैवाने पालक सावध होते. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. काही मिनिटांतच त्याला वाचवण्याची व्यवस्था करण्यात आली.
हे वाचा : राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी!
अग्निशमन दलाच्या पथकाने खाली गादी बसवल्याचं बघायला मिळतं. इतक्यात मुलाचा हात सुटला आणि तो 17व्या मजल्यावरून जमिनीवर पडला. कदाचित त्याचा मृत्यू होईल असं वाटत होतं. मात्र खाली अग्निशमन दलाचं पथक सतर्क होतं. त्यामुळे तो वाचला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या हृदयाचे ठोके अतिशय वेगवान झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. त्याला दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
हा व्हिडिओ आतापर्यंत 7.8 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी लाईक केला आहे आणि अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधी अमेरिकेतील ओहियो प्रांतातील एका 16 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना धडा शिकवण्यासाठी अनोखं पाऊल उचललं होतं.
खरं तर, मुलगी दिवसभर फोनमध्ये व्यस्त असायची, म्हणून वडिलांनी तिचा आयफोन (Smart Phone) हिसकावला. यातूनच मुलीने 911 वर वडिलांची तक्रार करण्यासाठी पोलिसांना फोन केला. पोलिसही घरी पोहोचले. काही दिवसांपूर्वी अजमेरमधून बातमी आली होती की, वडिलांनी मुलीकडून मोबाईल परत घेतला तेव्हा तिने आत्महत्या केली. मुलगी अकरावीत शिकत होती. मोबाईल परत घेतल्याने ती नैराश्यात होती.
Iiieeeep cuidao pic.twitter.com/2pxtEXR8YM
— pikochumiko (@chumikopiko) March 4, 2023