रंगांचा सण म्हणजे होळी (Holi). संपूर्ण देशात धूमधडाक्यात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. फक्त सर्वसामान्य नाही, स्टार क्रिकेटर्सनी सुद्धा रंगपंचमीचा आनंद लुटला. विराट कोहली असो, किंवा रोहित शर्मा सर्वांनीच या सणाचा आनंद लुटला. एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्समध्ये सुद्धा रंगपंचमीचा उत्साह दिसून आला.
चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या टि्वटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात फ्रेंचायजीचे खेळाडू रंगपंचमी खेळताना दिसतायत. सीएसकेची टीम रंगपंचमी खेळली पण कोणीधोनीला हात लावण्याची हिम्मत केली नाही. त्याच्या चेहऱ्यावर रंग दिसला नाही.
धोनीच्या टीममधील खेळाडू परस्परांना रंग लावताना दिसले. चेन्नईच्या टीमने जो व्हिडिओ पोस्ट केलाय, त्याची सुरुवात शोले चित्रपटातील विलन गब्बर सिंहच्या डायलॉगने होते. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे विचारतो, कधी आहे होळी? (Holi) त्यानंतर खेळाडू रंग लावण्यासाठी परस्परांवर तुटून पडले. चेन्नई टीमचे युवा खेळाडू मौज-मस्ती करताना दिसले.
हे वाचा : 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो महिला दिन? जाणून घ्या
सीएसके टीममधील प्रशांत सोलंकीला रंग लावण्यासाठी सहकारी खेळाडूंनी त्याला अक्षरक्ष: खेचून आणलं. त्यानंतर त्याच्यावर गुलाल टाकण्यात आला. व्हिडिओच्या अखेरीस धोनी सुद्धा दिसला. पण त्याचा चेहरा स्वच्छ होता. धोनी काहीतरी खात होता. टीममधील कुठल्याही खेळाडूने धोनीला रंग लावण्याची हिम्मत केली नाही.
भारतीय क्रिकेट टीमने अहमदाबादमध्ये रंगपंचमी साजरी केली. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल बसमध्ये परस्परांवर रंग उडवताना दिसले रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल सर्वांचे चेहरे गुलालाने (Holi) माखलेले होते. आता 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियाने अशीच विजयाची धुळवड साजरी करावी, अशी इच्छा आहे. टीम इंडिया चालू सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. अहमदाबादमध्ये विजय मिळवल्यास टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच तिकीट मिळेल.
Ab hua na Holi Start 🎨🥳
Super Holi everyone.!💛#HappyHoli #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/EnmpwWKbHn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 7, 2023