भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याच चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. यातील अखेरचा सामना ९ मार्च रोजी गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाईल. रोहित शर्माच्या (Cricket) नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलीय.
तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला अहमदाबाद कसोटी महत्त्वाची असणार आहे. मात्र चौथी कसोटी सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता पुढचे सहा महिने मैदानावर दिसणार नाही.
दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला बुमराह गेल्या आठवड्यात उपचारासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला होता. पाठीच्या दुखापतमुळे तो (Cricket) आशिया कप आणि टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये खेळला नव्हता. आता त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आले असून आणखी सहा महिने त्याला मैदानापासून दूर रहावे लागणार आहे.
हे वाचा : महिला दिनी एका प्रश्नाचं उत्तर द्या; जागतिक पुरुष दिन कधी असतो माहितीये ?
बुमरहावर न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च इथं सर्जरी करण्यात आली. प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन रोवन स्काउटन यांनी त्याच्यावर यशस्वी सर्जरी केली आहे. दरम्यान, त्याला आता ६ महिने क्रिकेट खेळता येणार नाही. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ मध्ये भाग घेण्यावरही प्रश्न उपस्थित होत आहे.
बुमराहने आतापर्यंत भारताकडून ३० कसोटी (Cricket) सामने, ७२ वनडे आणि ६० एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे १२८, १२१ आणि ७० विकेट घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना १२० सामन्यात त्याने १४५ विकेट घेतल्या आहेत.