रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (War) सुरू असताना (Russian invasion of Ukraine) आणखी एका लष्करी संघर्षाची भीती अधिक गडद होऊ लागली आहे. उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या युद्धखोर वृत्तीमुळं ही चिंता वाढू लागली आहे.उत्तर कोरिया शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत असून विविध शस्त्रांच्या वेगानं चाचण्या करत आहे. ताज्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या (South Korea) लष्करानं केला आहे.
याआधी बुधवारी दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाच्या हवाई क्षेपणास्त्र स्फोटात उत्तर कोरियाच्या सर्वात मोठे शस्त्र असलेल्या ह्वासाँग-17 क्षेपणास्त्राचे काही भाग असल्याचे सांगितले. आता रविवारी दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, त्यांना कळलं आहे की, उत्तर कोरियानं पश्चिम किनारपट्टीवरून अनेक रॉकेट सोडले आहेत.
दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, आमचं सैन्य उत्तर कोरियाच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. हे पुतिन यांना अन्नातून विष दिलं जाण्याची भीती.. 1000 वैयक्तिक कर्मचाऱ्यांना हटवलं दक्षिण कोरियाच्या लष्करी प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आज सकाळी उत्तर कोरियामध्ये गोळीबार झाला असून त्यात अनेक रॉकेट लाँचर डागण्यात आले आहेत.