आयपीएल (IPL) सुरु होण्यापूर्वी आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता आयपीएमलमधील सामने चाहत्यांना लाइव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे.
आयपीएलच्या सामन्यांसाठी किती प्रेक्षकांना परवानगी मिळणार, पाहा…
गेल्यावर्षी आयपीएलमध्ये चाहत्यांना प्रवेश देण्यातआला नव्हता. पण यावर्षी मात्र आयपीएलसाठी सर्वसामान्य चाहत्यांना मैदानात जाऊन सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारने स्टेडियमच्या आसन क्षमतेच्या २५ टक्के परवानगी दिली आहे.
आयपीएलच्या (IPL) पुढच्या काही सामन्यांसाठी २५ ऐवजी ५० टक्केही परवानगी देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. मुंबई क्रिकेट असोसिशेनच्या आशिष शेलार यांनी याबाबतची मागणी केली आहे. त्यानुसार वानखेडे स्टेडियममध्ये ९,८०० ते १०, हजार चाहत्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो.
त्याचबरोबर ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ७ ते ८ हजार चाहत्यांना सामना पाहण्याची संधी मिळू शकते. नवी मुंबईमधील डी. वाय. पाटील स्टेडिममध्ये ११ ते १२ हजार सर्व सामान्य चाहत्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो, त्याचबरोबर पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये १२ हजार चाहत्यांना प्रवेश मिळू शकतो. प्रत्येक स्टेडियमच्या क्षमतेनुसार सामान्य जनतेसाठी तिकिटांची विक्री केली जाऊ शकते.
त्यामुळे आता आयपीएलचे (IPL) सामने थेट मैदानात जाऊन पाहण्याची संधी यावेळी चाहत्यांना मिळणार आहे. आयपीएलचे साखळी फेरीचे सामने या चार मैदानांमध्ये होणार आहेत. पण बाद फेरीचे सामने मात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यावेळी गुजरात सरकार याबाबत काय निर्णय घेते, त्यानुसार चाहत्यांना आयपीएलचे सामना पाहता येणार आहे.
सध्याच्या घडीला अजून सामन्यांसाठी चाहते किती आतूर आहेत, याचा अंदाच आलेला नाही. त्याचबरोबर सुरक्षिततेचे उपाय म्हणून आसन क्षमतेच्या २५ टक्के एवढीच परवानगी आता देण्यात आलेली आहे. जसजशी स्पर्धा रंगत जाईल, त्यानुसार सरकार चाहत्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. पण सध्याच्या घडीला तरी २५ टक्के एवढीच परवानगी महाराष्ट्राच्या सरकारने दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना यावर्षी आयपीएलचे सामने स्टेडियमध्ये जाऊन पाहण्याची मजा अनुभवता येणार आहे.
क्रिकेट फैंस के लिए खुशखबरी, आईपीएल के दौरान 25 प्रतिशत से ज्यादा दर्शकों को मैदान में एंट्री देने की तैयारी!https://t.co/sArWOYMxdM#BCCI #IPL #IPL2022 pic.twitter.com/oZFr3d3LGe
— NBT Sports (@NBT_Sports) March 21, 2022