Tuesday, May 6, 2025

अग्नीशमन दलाच्या जवानांमुळे मोठा अनर्थ टळला; अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले असते?

पुणे शहरात मध्यरात्री आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही बँकेला आग लागली. या आगीत बँकेतील महत्वाची कागदपत्रे जळाली. परंतु अग्नीशमन दलाच्या (Firefighters) जवानांमुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा पुणे शहर ४०० सिलेंडरच्या स्फोटाने हादरले असते. वाघोली येथील आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आग लागली. शुभ सजावट या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेले ४ सिलेंडर फुटले. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले. परंतु या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

या भीषण आगीत दुर्देवाने तीन कामगारांचे मृतदेह आढळले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. परंतु अग्नीशमन दलाच्या जवानांनी चांगली कामगिरी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवले. शेजारी ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. त्या ठिकाणांपर्यंत आग जाऊ नये, यासाठी नियोजन केले. आगीवर वेळेतच नियंत्रण मिळवले. यामुले पुढील धोका टळला. अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे शहर हादरले असते.

आगीसंदर्भात बोलताना पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या (Firefighters) अधिकाऱ्याने सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच 400 सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.”

पिंपरी चिंचवडमध्ये खराळवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कागदपत्रे जळून खाक झाली असून दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म