भारतीय क्रीडाजगतामध्ये पुरुष संघासोबतच आता महिला संघालाही तितकीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे. पुरुष खेळाडूंप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंच्या नावालाही प्रसिद्धीचं वलय मिळालं आहे. त्याच यादीतलं एक नाव म्हणजे स्मृती मंधानाचं.
स्मृती मंधाना तिच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त सध्या चर्चेत येण्याचं कारण ठरत आहे तो म्हणजे एक बॉलिवूड कलाकार (Relationship ). भारतीय महिला क्रिकेट संघात धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाणारी स्मृती मंधाना सध्या सोशल मीडियावर कमालीची ट्रेंडमध्ये आहे.
एकिकडे नॅशनल क्रश असणारी ही खेळाडू म्हणे लोकप्रिय संगीत दिग्दर्शक पलाश मुछाल याला डेट करत आहे. त्यानं हातावर SM18 असा टॅट्टू करुन घेतला आहे.
SM चा अर्थ वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. तर 18 हा स्मृतीच्या जर्सीचा क्रमांक आहे. मुख्य म्हणजे आजपर्यंत अनेकदा स्मृती आणि पलाशला एकत्र पाहिलंही गेलं आहे.
पलाशच्या गाण्यांचं प्रमोशनही खुद्द स्मृतीनं केलं आहे. मैत्री किंवा आणखी खास नातं असतानाही स्मृती मात्र जाहीरपणे यासंदर्भात फार काही बोलताना दिसत नाही. पण, खरंच त्यांचं हे नातं आकारास येत असल्यास चाहत्यांना फारच आनंद होईल यात शंका नाही.
View this post on Instagram