Wednesday, June 25, 2025

12 वीचा निकाल आज जाहीर होणार, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  इयत्ता १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता १२ वीचा निकाल  २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल जाहीर होत आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या mahresult.nic.in वर पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahresult.nic.in जाऊन HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या. निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाल msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org, या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

निकालानंतर काही दिवसांनी गुणपत्रिका मिळतील

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. उद्या (गुरुवार, २५ मे) निकाल घोषित केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून गुणपत्रिका (हार्ड कॉपी/ओरिजिनलमार्कशीट) मिळतील.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  1. https://mahresult.nic.in/

  2. https://hscresult.mkcl.org/

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म