Sunday, April 20, 2025

WAR : युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?

आपल्या सगळ्यांना हे तर माहितच आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यांतील भांडण (WAR) अनेक दिवसांपासून शांत होण्याचं नावच घेत नाही आहेत. मंगळवारी या युद्धाला 27 दिवस पूर्ण झाले आहे. परंतु दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीत. रशिया युक्रेनवर एका मागून एक हल्ले करतच आहे.

परंतु युक्रेन देखील ठाम आहे. परंतु या युद्धाच्या परिस्थीतीत एका भलत्याच गोष्टीची चर्चा होत आहे. ती म्हणजे युक्रेनच्या राष्ट्रपती जेलेंस्की यांच्या कपड्यांची. युद्ध सुरु झाल्यानंतर आपल्यापैकी अनेक लोकांनी युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांना व्हिडीओमध्ये पाहिले असेल.

त्यांनी युद्ध (WAR) परिस्थीती अनेक देशांना संबोधीत करणारे व्हिडीओ बनवले होते. परंतु या सगळ्या व्हिडीओमध्ये ते एकाच हिरव्या रंगाच्या कपड्यात दिसले.त्यांनी सगळ्याच व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाचे टी शर्ट घातले आहे. मग ते फक्त आणि फक्त हिरव्या रंगाचे कपडे का घालतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर या मागचं एक कारण समोर आलं आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सी हिरवे कपडेच का घालतात?

खरेतर जेलेंस्की हे नेता असण्यासोबतच एक अभिनेता देखील आहेत. तसेच ते जेव्हा ही सर्वांसमोर येतात, तेव्हा ते काहीना काही संदेश देण्याच्या उद्देशानेच येतात. नेहमीच त्यांच्या हावभावासोबत त्यांच्या कपड्यांमध्ये देखील काही संदेश लपलेला असतो.

आता युद्धादरम्यान ते हिरव्या टीशर्ट माधून देखील एक संदेश देत आहेत. ते स्वत:ला बंडखोर आणि पोस्टरबॉयप्रमाणे जगासमोर सादर करत आहेत.ज्यामुळे त्यांनी या हिरव्या रंगाच्याच टी-शर्टमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपियन युनियनला संबोधित केले आहे. या देशांच्या खासदारांनीही त्याच्यासाठी खूप टाळ्या वाजवल्या आहेत.

जेलेंस्की सोबतच पुतिन यांचे कपडे देखील खूप चर्चेत आहे. त्यांच्या कपडे घालण्याच्या स्टाईलने असे दिसते की, या संपूर्ण परिस्थितीवर त्यांचे नियंत्रण आहे, ते आत्मविश्वासाने भरलेले आहे आणि युक्रेन आणि उर्वरित पाश्चात्य देशांवर त्यांचे पूर्ण वर्चस्व आहे.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, व्लादिमीर पुतिन हे युद्ध (WAR) परिस्थीतीत देखील इतके महागडे कपडे घालून सर्वांसमोर येतात, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सुमारे 14 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच, 11 लाख रुपये किमतीचे जॅकेट घातले होते. जे प्रसिद्ध इटालियन कंपनी Loro Piana (Lauro Piana) ने डिझाइन केले आहे.तर पुतिन यांनी या जॅकेटखाली घातलेल्या स्वेटरची किंमत 4 हजार 218 अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म