Buying gold and silver : सोने स्वस्त झाले, चांदीच्या दरातही मोठी घसरण,आजचे दर

जर तुम्ही सोने-चांदी खरेदी (Buying gold and silver) करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या- चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.परदेशात मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण झाल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 408 रुपयांची घसरण झाली असून, 52,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

मागील आठवड्यात सोन्याचे दर 53,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. देशांतर्गत वायदे बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी सायंकाळी, 5 डिसेंबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी(gold and silver)चा सोन्याचे दर 0.40 टक्क्यांनी किंवा 209 रुपयांनी घसरून MCX एक्सचेंजवर 52,379 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

सोन्यासह चांदीच्या दरातही घट (Buying gold and silver) झाली. चांदीचे दर ६१,०७५ रुपये प्रति किलो आहे. ५ डिसेंबर रोजी येणाऱ्या चांदीची किंमत ०.८९ टक्के म्हणजेच ५४४ रुपयांनी घसरले आहेत. ६०,३३१ रुपये प्रति किलो ग्रॅम आहे.

हे वाचा : : टी-20 आधी संघाला मोठा धक्का…!

जागतिक बाजारपेठेत सोमवारी सायंकाळी सोन्याचे फ्युचर्स आणि स्पॉट किमतीत घसरण झाली. सोमवारी संध्याकाळी कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.७२ टक्क्यांनी कमी होऊन १७५६.२० डॉलर प्रति औंस झाली. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या 1740.73 प्रति डॉलर औंसवर आहे.

जागतिक चांदी बाजारात सोमवारी संध्याकाळी फ्युचर्स आणि स्पॉट किमतींमध्ये घसरण झाली. सोमवारी संध्याकाळी चांदीची जागतिक फ्युचर्स किंमत कॉमेक्सवर 1.68 टक्क्यांनी किंवा 0.36 डॉलर ने कमी (Buying gold and silver) होऊन 20.84 प्रति डॉलर औंसवर होती. चांदीची जागतिक स्पॉट किंमत सध्या 1.22 टक्क्यांनी किंवा 0.26 डॉलरने कमी होऊन 20.69 डॉलर प्रति औंसवर आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म