देशातील तेल कंपन्यांकडून दररोज प्रमाणे आज देखील पेट्रोल- डिझेलचे (petrol diesel price) नवीन दर जाहीर केले आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये आज 1.94 टक्के भाव वाढ झाली आहे.
त्यामुळे हे कच्चे तेल 79.68 डॉलर प्रति बॅरल विक्री झाले. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. मात्र त्यानंतरही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 04-03-23
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (petrol diesel price) विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर पैसे मोजावे लागणार आहे. कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर रुपयांनी विकले जात आहे.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे
इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर :
- लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे
- पाटण्यात पेट्रोल 107.48 रुपये आणि डिझेल 94.26 रुपये प्रति लिटर आहे
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.08 रुपये आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर आहे
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर आहे
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
घरबसल्या चेक करा नवे दर
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.