दिवाळी सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाचे दर विक्रमी नीचांकी पातळीवर आल्यानंतर आता त्यात वाढ होत आहे. उत्पादन कपातीमुळे क्रूडच्या किमती वाढत आहेत. कच्चे तेल प्रति बॅरल $90 च्या वर पुन्हा चढताना दिसत आहे.
दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू होती, मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला दिसत नाही.
व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त
ऑक्टोबरच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. मात्र त्यावेळी तेलाच्या दरात कोणताही दिलासा देण्यात आला नव्हता. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 मे रोजी बदल झाला होता.
त्यानंतर इतके दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.
कच्च्या तेलाचे आजचे दर
सोमवारी सकाळी WTI क्रूड (crude oil) प्रति बॅरल सुमारे $88.09 वर दिसले. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड $ 90 च्या वर चढून $ 93.50 प्रति बॅरलवर पोहोचले. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, मेघालयमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली.
शहर आणि तेलाच्या किमती
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
दरम्यान सरकारी मालकीच्या तेल कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड , इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर दररोज तेलाच्या किमती जारी करतात.
पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी सकाळी 6 वाजल्यापासून केली जाते. जेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटप्रमाणे फरक असतो, तेव्हा राज्यांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे राहत नाहीत.
यासारख्या इतर शहरांचे दर तपासा
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी तेल कंपन्या एसएमएसद्वारे किंमत तपासण्याची सुविधा देतात. दर तपासण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकाला RSP (डिलर कोड) लिहून 9224992249 वर पाठवावा लागेल. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर एसएमएस करतात आणि BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करतात.