Friday, April 11, 2025

crude oil : महिन्याच्या शेवटच्या दिवशी इंधनाचे दर जाणून घ्या ??

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतींचा आधारावर देशभरात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट केले जातात. आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अशा स्थितीत आज महिन्याच्या शेवटी सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला झळ बसणार की थोडा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव कमी तर काही ठिकाणी हा भाव जास्त आहे.

भारतात बऱ्याच महिन्यांपासून चारही महानगरांमध्ये इंधन दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. याशिवाय आजही दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चारही महानगरांमध्ये किमती स्थिर आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीबद्दल बोलायचे तर आज म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी WTI क्रूड ऑइलच्या दरात ०.०९ टक्के किंचित वाढीसह ७५.७५ डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे.

हे वाचा : ग्रॅज्यएट उमेदवारांच्या तब्बल 600 जागांसाठी भरती; आजशेवटची तारीख; करा अप्लाय

दुसरीकडे, ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात ०.८५ टक्क्यांची घसरण होत असून ते ८२.४५ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. अशा स्थितीत देशातील काही शहरांवर त्याचा परिणाम दिसत असून असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडे बदल पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही देशाच्या चारही महानगरांमध्ये इंधनचे दर ‘जैसे थे’ आहेत.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कसे तपासणार?

दरम्यान, सरकारी तेल कंपन्या  (crude oil) दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर करतात. प्रत्येक शहरात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. पण तुम्ही मोबाईलद्वारेही पेट्रोल-डिझेलच्या किमती तपासू शकतात. जर तुम्ही इंडियन इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवून किमती तपासू शतकतात तर जर तुम्ही BPCL चे ग्राहक असाल तर दर तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ वर पाठवा. दुसरीकडे, HPCL चे ग्राहक पेट्रोल-डिझेलचे दर तपासण्यासाठी ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा.

यानंतर, कंपनी काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत पाठवतील.
लक्षात घ्या की राष्ट्रीय पातळीवर गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस इंधनाच्या किमती सुधारित करण्यात आल्या होत्या. केंद्राने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर संपूर्ण देशात राज्य सरकारच्या कर धोरणाव्यतिरिक्त कुठेच इंधनाच्या भावात मोठा बदल झाला नाही.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म