महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात वाढ केली. रिझर्व्ह बँकेनं देखील 0.35 टक्क्यांनी व्याजदर वाढवला आहे. त्यानंतर बहुतेक सगळ्या बँकांनी EMI आणि लोनचं व्याजदर वाढवलं आहे. आता HDFC आणि Axis बँकेनं आपले नवे EMI आणि लोनचे व्याजदर जाहीर केले आहेत.
HDFC आणि Axis बँकेचं लोन घेतलेल्या ग्राहकांना चांगलाच दणका बसणार आहे. अॅक्सिस बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड-बेस्ड लेंडिंग रेट्स मध्ये 30 बेसिस पॉइंट्सची वाढ केली. त्यामुळे एमसीएलआर-लिंक्ड टर्म लोनवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.
MCLR मध्ये वाढ करण्यात आल्याने आता EMI आणि लोन महाग होणार आहे. नवे एमसीएलआर दर 17 डिसेंबर २०२२ पासून लागू करण्यात आले आहेत. 1-वर्षाचा एमसीएलआर आता मागील 8.45% च्या तुलनेत 8.75% वाढला आहे. र 2-वर्ष आणि 3-वर्षाचा एमसीएलआर आता 8.55% आणि 8.60% च्या आधीच्या दरांच्या तुलनेत 8.85% आणि 8.90% आहे.
हे वाचा : साईभक्तांसाठी मोठी बातमी, तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून होणार सुटका…
सहा महिन्यांचा एमसीएलआर आधीच्या 8.40% वरून 8.70% पर्यंत वाढला आहे आणि तीन महिन्यांचा एमसीएलआर देखील आधीच्या 8.35% वरून 8.65% पर्यंत वाढला आहे. महिना आणि रात्रभर एमसीएलआर 8.55% आहे, जो मागील 8.25% च्या तुलनेत आहे.
देशातील आघाडीची गृहकर्ज देणारी कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने सोमवारी आपल्या रिटेल प्राइम लोनच्या दरात 0.35 टक्के वाढ जाहीर केली. यामुळे एचडीएफसी हाऊसिंग लोनचा किमान (EMI) दर आता 8.65 टक्के झाला आहे.