Monday, April 21, 2025

किती Bank Accounts उघडता येतात, त्याचे फायदे माहिती आहेत का?

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपण किती खाती (bank accounts) उघडू शकतो? तर यावर कोणतंही बंधन नाही. तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडू शकता. त्यासाठी सरकारने कोणताही नियम ठेवलेला नाही.आर्थिक सल्लागारांच्या मते जास्त बँक खाती असणं फायद्याचं आणि तोट्याचं आहे.

जास्त खाती असल्याने ITR फाईल करायला अडचणी येतात. दुसरं म्हणजे प्रत्येक खात्यावर मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. त्यामुळे पैसे अडकून राहतात. नाहीतर फाइन भरावा लागतो. त्यामुळे पैसे वाया जातात. फसवणुकीचे प्रकार वाढतात अशा अनेक गोष्टी असल्या तरी एका पेक्षा जास्त खातं असायला हवं असंही सल्लागार म्हणतात.

वेल्थ क्रिएटर्स फायनान्शियल अॅडव्हायझर्सचे सह-संस्थापक विनित अय्यर म्हणतात की, एखाद्या व्यक्तीची तीनपेक्षा जास्त बँक खाती  (bank accounts) नसावीत. 3 पर्यंत बँक खाते असल्‍याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते सांगितलं आहे.

तीन खाती कशी असावीत याचंही वर्गीकरण तज्ज्ञांनी दिलं आहे. एक तुमचं सॅलरी अकाउंट असायला हवं. दुसरं तुमचं सेव्हिंग खातं असायला हवं. जिथून तुम्ही कधीच पैसे काढणार नाही. तिसरं म्हणजे इमरजन्सीसाठी लागणारे पैसे तिसऱ्या खात्यावर असायला हवेत.

पैसे वेगवेगळ्या खात्यात विभागून ठेवल्याने आर्थिक संकटं आली तरी तुम्ही आधीचपासूनच त्यासाठी तयार असाल. तुमच्याकडे पर्यायी बँकेतील पैसे बॅकअपसाठी असतील. आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही दुसऱ्या बँकेतून पैसे काढू शकता.तुमच्याकडे दोन बँकांची खाती असतील तर तुम्ही दोन्ही बँकेतून रक्कम काढू शकता.

एकावेळी एका कार्डमधून पैसे काढण्यासाठी रक्कम ठरवून दिलेली असते. त्यावर पैसे काढता येत नाहीत.चार्टर्ड अकाऊंटेंट राजेंद्र वाधवा सांगतात की, बँक (bank accounts) बुडाल्यानंतर आता सरकार प्रत्येक खातेदाराला ५ लाख रुपये देते. जर तुमच्याकडे जास्त बचत खाते असेल तर तुमचे पैसे बुडण्याचा धोकाही कमी होतो.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म