तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो गॅस (Gas) सिलिंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे हे नवीन दर आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. नवीन दर लागू झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत एलपीजीचा व्यावसायिक सिलिंडर 1833 रुपयांना मिळणार आहे. महिन्याच्या पहिल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. नोव्हेंबर महिना सुरू होताच तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महाग केले आहेत.
ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीही किमती वाढल्या होत्या. उल्लेखनीय आहे की, तेल कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेलाही व्यावसायिक (lpg) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
हे वाचा : 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळताय Samsung चे जबरदस्त स्मार्टफोन!
ऑक्टोबरमध्ये नवीन दर लागू झाल्यानंतर, दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1731.50 रुपये झाली होती, जी नोव्हेंबरमध्ये वाढलेल्या दरानंतर आता 1833 रुपये झाली आहे. मात्र, ऑक्टोबरमध्येही केवळ व्यावसायिक एलपीजी गॅस (Gas) सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ? एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरवरच लागू होतील. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 929 रुपये आहे. तर मुंबई, महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902.5 रुपये आहे. चेन्नईतही घरगुती गॅस (Gas) सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे.