देशभरात मागील वर्षापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel) कोणताही बदल झालेल नाही. मात्र ही स्थिती आता लवकर बदलू शकते. याचे कारण असे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान पोर्टब्लेयर येथे देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल म्हणजेच 84.10 रुपयांनी मिळत आहे तर डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या किमती आजही स्थिर आहेत.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल (Petrol Diesel) 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
तसेच गेल्या 24 तासांत कच्चा तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूडची किंमत $0.70 ने घसरून $79.27 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. त्याच वेळी, WTI ची किंमत प्रति बॅरल $ 0.63 ने घसरून $ 74.40 वर आली आहे.
हे वाचा : तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याची आत्महत्या; ‘हे’ आहे कारण
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel) नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.