महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा 12वीचा निकाल (Result) 8 जून म्हणजे आज जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सह अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकणार आहेत.12वी ची परीक्षा यंदा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आली होती. यंदा 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे.