जळगावमधून भिषण अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. शहरातील खोटे नगर, वाटीकाश्रम परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. मात्र त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाखाली आल्यानं 30 वर्षीय तरुण जागीच ठार झाला .
तर दुचाकीवर असलेल्या त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशांत भागवत तायडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे.
हे वाचा : छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊंना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात काय होतं? पाहा
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र रावेर तालुक्यातील गहुखेडा येथून दुचाकीने बांभोरीकडे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास खोटे नगर जवळील वाटिकाश्रम परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर पडले.
तेवढ्यात समोरून खडीने भरलेला ट्रॅक्टर येत होता. या ट्रॅक्टरचे समोरचे चाक प्रशांत तायडे याच्या डोक्यावरून गेल्यानं या अपघातामध्ये (Accident) त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जयेश पाटील हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.