Sunday, June 22, 2025

Accident चालत्या ट्रकचं चाक निघालं, आणि असं घडलं की..

भंडारा जिल्ह्यात एक विचित्र अपघात (Accident) घडला आहे. दोन ट्रक आणि बस यांच्यात हा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे फोटो आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या अपघाताने जीवितहानी झाली नाही पण महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. अखेर पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.

भंडारा जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर बेला परिसराजवळ संबंधित घटना घडली. दोन ट्रक आणि राज्य परिवहन विभागाच्या एका बसमध्ये विचित्र अपघात झाला. खरंतर एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना या तीनही वाहनांचा विचित्र अपघात झाला.

भंडाराहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा अचानक टायर निघाल्याने तो अनियंत्रित झाला. यावेळी त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक आणि ट्रेलरच्या मागे असणारी बस सुद्धा अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणारा ट्रक आणि बसमध्ये अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे अपघातग्रस्त (Accident) बसपासून बचाव करणारा ट्रक अनियंत्रित होऊन पलटला. तर प्रवाशांना वाचवण्यासाठी बस चालकाने सरळ बस रस्त्याच्या कडेला नाल्यात उतरवली. यात सर्वांचे नशीब इतके बलवत्तर होते की एकाही वाहनातील व्यक्तिची जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातानंतर वाहतूक मात्र खोळंबली होती.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात आज आणखी एक भीषण अपघात झाला आहे. अनियंत्रित ट्रक पलटल्याने ट्रक खाली दबुन ड्रायव्हरचा मृत्यु झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर धारगाव येथे घडली. रात्री 2 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेत क्लीनर हा थोडक्यात बचावला आहे. मृत डायव्हरचे नाव सर्वेश सोनी असे आहे. तो छत्तीसगढ़ येथील रहिवाशी होता.

काटोल वरुन चन्याची दाळ घेऊन हा ट्रक कोलकाताकडे निघाला होता. रस्ता न सूचल्याने ट्रक हा विरुद्ध बाजूला गेला. त्याला पुन्हा आपल्या योग्य दिशेने आणण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटला. यात ट्रक खाली दबुन ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेनंतर याबाबतची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला करत मृत ड्राइवर चे शव बाहेर काढण्यात आले आहे. कारधा पोलिसांनी या अपघाताची (Accident) नोंद केली आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म