Sunday, March 22, 2026

Crime श्रद्धा ची हत्या केल्याची आफताबची कबुली; कोर्टासमोर नेमकं काय म्हणाला?

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या (Crime) प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली आहे.श्रद्धा हत्या प्रकरणाची सुनावणी दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये सुरु आहे. कोर्टाने आफताबच्या कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ केली आहे.

आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत, त्यामुळे त्या पोलिसांना सांगू शकत नाही. परंतु आपण तपासामध्ये सहकार्य करीत असल्याचं आफताबने सांगितलं. रागाच्या भरामध्ये श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या आरोपी आफताब या प्रकरणात नवनव्या गुन्ह्यांची (Crime) गोष्टींची कबूली देत आहे पण अशात आफताब पोलिसांना कितपत खरं सांगतोय, यावर संशंय घेतला जात आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याची नार्को टेस्ट केली जाणार असल्याचं बोललं जात होतं पण पोलिसांनी त्या अगोदर पॉलिग्राफ टेस्ट करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आता आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

हे वाचा : पास झाला अजय देवगणचा ‘दृश्यम 2, कमावले इतके कोटी रुपये

दरम्यान, या प्रकरणामध्ये एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. श्रद्धा वालकर खून (Crime) प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी याचिका दाखल करत दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांचा तपास योग्य रितीने होत नाही. दिल्ली पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, तसंच त्यांच्याकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक कौशल्याची आणि उपकरणांचीही कमतरता आहे. त्यामुळे ६ महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचे पुरावे आणि साक्षीदार शोधण्यास दिल्ली पोलीस सक्षम नाहीत, असं या याचिकेत म्हटलं आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म