Saturday, June 21, 2025

हृदयद्रावक! तरुण मुलगा गमावला अन्, मातेनं उचललं टोकाचं पाऊल

पैठण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्या मुलाच्या विरहात गळफास घेऊन आपलं जीवनं संपवलं. दोन मार्च रोजी मुलाने आत्महत्या (Crime) केली होती. मुलाचा विरह सहन न झाल्यानं अखेर आईने देखील गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिवणाईमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या विरहात आईने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मार्च रोजी मुलगा रितेश काळे याने आत्महत्या केली होती.

हे वाचा : आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम ?

मात्र मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का या मातेला बसला होता. मुलाचा विरह सहन न झाल्यानं मातेनं देखील टोकाचं पाऊल उचललं. गळफास (Crime) घेऊन आपलं जीवन संपवलं. रुख्मणबाई रमेश काळे असं या महिलेचं नाव आहे. त्यांनी आपल्या राहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वीच मुलाचं निधन झालं होतं. मात्र मुलाच्या निधनाचा धक्का सहन न करू शकल्यानं, रुख्मणबाई यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. महिन्याच्या आतच आई आणि लेकाचा मृत्यू झाल्यानं तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म