नाशिक जिल्ह्यातील मेरी शासकीय वसाहतीत एका व्यक्तीचा खून (Crime) करण्यात आला. गळा आवळून सरकारी विभागात कर्मचारी असणाऱ्या इसमाचा खून करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे ही बाब ज्या प्रकारे उघडकीस आली, त्याने घटनेचं गूढ अधिक वाढलंय.
या हत्या प्रकरणाची नोंद पंचवटी पोलिसांनी करुन घेतली आहे. आता पुढील तपास केला जातो आहे.संजय वायकंडे यांचं शव राहत्या घरात आढळून आलं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी गावी गेली होती. ती गावावरुन जेव्हा सासरी परतली, तेव्हा पतीची अवस्था पाहून ती हादरुनच गेली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.
हे वाचा : Rain Alart थंडी देणार दांडी, पाऊस पुन्हा थैमान घालणार?
संजय वायकंडे हे जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत होते. घरात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या संजय वायकंडे यांच्याबाबत पोलिसांनाही कळवण्यात आलं. पोलिसांच्या तपासातून संजय वायकंडे हे मृतावस्थेत (Crime) असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. विशेष म्हणजे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झालाय.
पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये संजय वायकंडे यांची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचं गूढ अधिक वाढलंय. संजय वायकंडे यांच्या हत्येला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
मृत वायकंडे यांची बायको घरी आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे या हत्येचा घटनाक्रम आणि हत्या कुणी केली? का केली? याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
पोलिसांनी या हत्याप्रकरणी (Crime) चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, संजय यांच्या परिचयाच्या व्यक्ती आणि इतर बाबींच्या सखोल चौकशीतून या हत्येचं गूढ उकलतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.