ग्वालिअरच्या गुन्हे शाखेने एक किचकट गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केलं आहे. दोन वर्षांपूर्वी आपल्या पत्नी व मुलाची हत्या (Crime) करुन मोकाट फिरत होता. शिवराज उर्फ राजा चौहान ग्वालियर येथील असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या जन्मात केलेल्या पापांची शिक्षा इथेच फेडावी लागते असं म्हणतात. तसंच, काहीसं शिवराज चौहान याच्यासोबत झालं आहे.
शिवराज आपल्या मित्रांसोबत (Friends) बिअर बारमध्ये बसला असताना त्याने पत्नी आणि मुलाच्या हत्येचा खुलासा केला आहे. त्यानं दोन वर्षापूर्वी केलेल्या हत्येचा घटनाक्रम सांगितला. शिवराजने सांगितलेल्या घटना तिथे असलेल्या एका व्यक्तीने ऐकली आणि याबाबत पोलिसांना सूचना दिली.
पोलिसांनी शिवराजला पकडण्यासाठी त्यांच्या एका खबऱ्याला देखील तिथे पाठवण्यात आलं होतं. तेव्हा शिवराजने त्याने केलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून दातिया पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली. त्यानंतर दुहेरी हत्याकांडाचं (Crime) संपूर्ण रहस्य समोर आलं.
२९ मे २०२० रोजी शिवराजने पत्नी आस्थाची रतनगढ माता या जंगलात गळा दाबून हत्या केली आणि तिच्या चेहऱ्यावर केरोसिन टाकून पूर्णपणे विद्रुप केला होता. जेणेकरुन मृतदेहाची ओळख पटू नये. त्याचबरोबर, त्यानं त्याच्या आठ वर्षांच्या मुलाचाही गळा घोटून खून केला.
त्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगादेखील आहे. साल २०२०पासून आस्था बेपत्ता आहे मात्र, आरोपीने जाणूनबुजून ती गायब असल्याची तक्रार दाखल केली नाही. गेल्या काही दिवसांपासून तो एका बारमध्ये जात होतो. तिथेच त्याने त्याच्या मित्रांना पत्नी व मुलाची हत्या (Crime) केल्याचं सांगितलं.
ग्वालिअरच्या गुन्हे शाखेला याबाबत माहिती झालं.गुन्हे शाखेनं दोन्ही बेपत्ता व्यक्तींच्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला आता ग्वालिअरतून दातिया येथे नेण्यात येणार आहे. तिथे त्याची चौकशी होणार आहे.