Crime मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्र्रेनमधून पडून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये दारावर लोंबकाळत असलेल्या तरुण खांबावर धडकला आणि खाली पडला. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईतील गोरेगाव आणि मालाड रेल्वे स्टेशनच्या दरम्यान घडली. रतन विश्वकर्मा असं या तरुणाचं नाव आहे. रतन विश्वकर्मा हा दररोज अंधेरी ते नालासोपारा लोकलने प्रवास करत होता. आज सुद्धा तो कामाच्या निमित्ताने लोकलने प्रवास करत होता.
Mumbai Indians :मुंबई इंडियन्सची काळजी वाढवणारी बातमी
पण, सकाळच्या वेळी लोकलला मोठी गर्दी होती. त्यामुळे रतनने लोकल ट्रेन पकडली असता दारावर थांबला होता. लोकल गोरेगाव ते मालाड रेल्वे स्टेशनच्या दरम्यान आली असता रुळालगत असलेल्या खांबाला रतन धडकला. जोराची धडक बसल्यामुळे रजत खाली कोसळला.
सोबत असलेल्या प्रवाशांनी तातडीने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन रजतला तातडीने कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी रजतला तपासून मृत घोषित केले. रजतचा मृतदेह भगवती हॉस्पिटमध्ये पाठवण्यात आला आहे. ही घटना लोकलमध्ये अतिरिक्त गर्दीमुळे झाली असल्याची माहिती समोर आली आहे.