मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे तू इतर मुलांसोबत का बोलतेस असे म्हणत एका तरुणाने अल्पवयीन मुलीला थापड बुक्क्यांनी मारहाण करून विष पाजून जीवे मारण्याचा (Crime) प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी आरोपी विरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन विठ्ठल वाळवंटे वय २२ वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास सोनपेठ पोलीस करत आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील अल्पवयीन (Crime) मुलगी घरामध्ये एकटी असताना नितीन वाळवंटे हा अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये आला. त्याने अल्पवयीन मुलीला मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे. तू इतर मुलांसोबत का बोलतेस असे म्हणून मुलीला थापड बुक्क्यांनी मारहाण करून मुलीचा विनयभंग केला. आरोपी नितीन हा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मुलीच्या तोंडामध्ये विष टाकून मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा : वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली
यानंतर आरोपीने स्वतः विष पिऊन मरून जातो अशी धमकी मुलीला दिली आणि घरातून पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर मुलीने याबाबतची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यामध्ये आरोपी नितीन वाळवंटे यांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंचक फड करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, सपोनि. संदीप बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली.