मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे भीषण अपघात (accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. शाहपुरा पोलिस स्टेशन आणि बिछिया पोलिस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात पिकअप वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याने हा अपघात झाला.
मृतांमध्ये 6 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.या अपघातात (accident) जखमीं झालेल्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेलेल्या माहितीनुसार, सर्वजण एक कार्यक्रम करुन घरी परतत होते. जखमींना शहपुरा आरोग्य केंद्रात दाखल करण्यातआले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
काही जणांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे. एक्सवर पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरीतील बडझर गावाजवळ हा भीषण अपघात (accident) झाला. पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटून पलटी झाली. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 21 जण जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत हे देवरी गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे कारण ब्रेक फेल असल्याचे सांगण्यात येत आहे.