Saturday, April 19, 2025

social media : तुनिषा शर्मानंतर आणखी एका तरुणीनं संपवलं जीवन

गेल्या काही काळापासून अनेक सेलिब्रिटी असं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं दिसत आहे. आत्महत्येच्या (social media) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नुकतंच टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मानं मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीनं हे टोकाचं पाऊल का उचललं असावं, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

तिच्या जाण्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तुनिषाच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसरली आहे. तिच्या दुःखातून सावरत नाही तोच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. आणखी एका तरुणीनं आपलं जीवन संपवल्याची वाईट बातमी समोर आली आहे.

सोशल मीडियावर (social media) प्रभाव टाकणाऱ्या लीना नागवंशीनं आत्महत्या केली आहे. लीना ही छत्तीसगडमधील सोशल इन्फ्य्ल्युएन्सर आणि यूट्यूबर होती. रायगड, छत्तीसगड येथील रहिवासी असलेल्या लीनाचा मृतदेह तिच्याच घराच्या छताला पाईपला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. या बातमीनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत लीना नागवंशी हिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह फाशीवरून खाली आणला होता. याप्रकरणी चक्रधर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीना नागवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, 22 वर्षीय लीना नागवंशी सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय होती. लीनाचे इंस्टाग्रामवर 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते आणि चाहत्यांना तिची स्टाइल खूप आवडायची. तिचे यूट्यूबवरही बरेच फॉलोवर्स होते. लीनानं हे टोकाचं पाऊल का उचललं असावं असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म