महाराष्ट्र सीईटी लॉ २०२१ ची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (Examination) कक्षातर्फे आजपासून पाच वर्ष लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया (MHT CET 2022) सुरु झाली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करता येणार आहे. लॉमध्ये करिअर करु इच्छिणारे उमेदवार येथे नोंदणी करु शकतात.
अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. उमेदवारांना ७ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :
महाराष्ट्र सीईटी लॉसाठी नोंदणी – १९ मार्च २०२२
महाराष्ट्र सीईटी लॉच्या नोंदणीची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२२
महाराष्ट्र सीईटी लॉ हॉल तिकीट – ३० एप्रिल २०२२
महाराष्ट्र सीईटी परीक्षेची तारीख – १७ आणि १९ मे २०२२महाराष्ट्र सीईटी लॉचा निकाल- तारखा नंतर जाहीर केल्या जातील.
MAH LLB CET 2022: नोंदणी प्रक्रिया
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
- ‘MAH-LLB (5 Years) CET-2022 (Integrated Course)’ या लिंकवर क्लिक करा.
- आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तपशील भरून आपली नोंदणी करा.
- अर्ज फी भरा आणि पुढे जा. फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
कोण करु शकतात अर्ज?
MAH CET २०२२ प्रवेश परीक्षेत पात्र होण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. भारतातील किंवा बाहेरील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून समकक्ष परीक्षा (Examination) उत्तीर्ण केलेली असावी.
संभाव्य वेळापत्रक जाहीर:
महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार,सीईटी सेलकडून केवळ इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर आदी पदवी अभ्यासक्रमांसाठी ‘एमएचटी-सीईटी’साठी फेब्रुवारीमध्येच ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू केली. मात्र, उर्वरित १४ सीईटी परीक्षांसाठी (Examination) अर्ज नोंदणी; तसेच वेळापत्रकाबाबत कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नव्हती. परीक्षांबाबत माहिती प्रसिद्धी करण्याची विद्यार्थी-पालकांनी मागणी केल्यानंतर, सीईटी सेलने आठ सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले.
त्यानुसार लॉ (पाच वर्षे), बीएड, लॉ (तीन वर्षे), बीपीएड, बीए-बीएड/ बीएस्सी-बीएड, बीएड-एमएड, एमपीएड, एमएड अशा आठ अभ्यासक्रमांना प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज नोंदणी, परीक्षेचा दिनांक याबाबतची सविस्तर माहिती १९ ते २४ मार्च या कालावधीत सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
या परीक्षा (Examination) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील, अशी माहिती सीईटी सेलद्वारे देण्यात आली. मात्र, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अखत्यारित येणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या सीईटींबाबत कोणतीही माहिती सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.