Friday, April 11, 2025

Maharashtra HSC result 2024 : बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार..?आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते निकालाची तारीख…

Maharashtra HSC result 2024 : बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार..? आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते निकालाची तारीख…

बारावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC result 2024) येत्या काही दिवसात जाहीर होऊ शकतो. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

बोर्डाकडून बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सकुता लागून राहिली आहे. या निकालासंदर्भात सूत्रांच्या आधारे एक माहिती मिळाली आहे. बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबतची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे

बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

सीबीएसईकडून दहावी आणि बारावीचा निकाल (Maharashtra HSC result 2024) नुकताच जाहीर करण्यात आला. या निकालानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरवणारे संदेश व्हायरल केले जात आहेत. अलीकडेच महाराष्ट्र बोर्डाकडून (MSBHSE) समाज माध्यमांवरच्या अफवांवर विश्वास ठेवू नये , असं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं होतं.

आता या निकाला संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या निकालाची तारीख आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी शैक्षणिक वर्ष 2022-23 चा निकाल 25 मे 2023 रोजी जाहीर झाला होता. त्यानुसार येत्या आठवड्याभरात बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल :

बारावी निकाला संदर्भात अधिक माहितीसाठी आणि प्रत्यक्ष निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेटू देऊ शकता.

  1. mahresult.nic.in
  2. mahahsscboard.in
  3. hscresult.mkcl.org
  4. results.gov.in

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना या निकाला संदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे. बारावीच्या निकालाची प्रत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरुपात तर महाविद्यालयात ऑफलाईन स्वरुपात निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी मिळेल.

तुम्ही ऑफलाइन निकाल असा पाहू शकता :

निकाल (Maharashtra HSC result 2024) जाहीर झाल्यानंतर ऑफलाइन तपासण्यासाठी, प्रथम तुमच्या फोनच्या message box मध्ये जा. आता MHHSC टाइप करा आणि स्पेस देऊन तुमचा सीट नंबर किंवा रोल नंबर लिहा. आता हा मेसेज ५७७६६ वर पाठवा. काही काळानंतर, तुम्हाला तुमच्या फोनच्या एसएमएस (sms) विभागात मजकूर संदेशाच्या स्वरूपात निकाल मिळेल. तो येथून तपासा.

तुम्ही याप्रमाणे ऑनलाइन निकाल पाहू शकता :

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, प्रथम maharesults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला MAH HSC Result 2024 नावाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. या पेजवर तुम्हाला तुमचे लॉगिनचे तपशील नोंदवावे लागतील. तपशील सादर करा आणि सबमिट करा.तुम्ही हे करताच तुमचा निकाल कॉम्पुटर च्या स्क्रीनवर दिसेल.

हे वाचा : एअरटेलचा जबरदस्त प्लॅन! 5 रुपयांपेक्षा स्वस्तात मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म