मराठीतील दिग्गज अभिनेते (actors) लक्ष्मीकांत बेर्डे अर्थातच सर्वसामान्यांचा ‘लक्ष्या’ वयोवृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. हा सुपरस्टार प्रत्येकालाच आपल्यातील वाटतो त्यामुळेच त्यांना प्रत्येक व्यक्ती आजही एकेरी नावाने ओळखते. लक्ष्मीकांत यांनी फारच कमी वयात जगाचा निरोप घेतला होता परंतु आपल्या कलेने ते आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. अनेक सेलिब्रेटी-चाहते त्यांच्याबाबतच्या आठवणी शेअर करत असतात. दरम्यान आता बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने लक्ष्मीकांतबाबतची आपली आठवण शेअर केली आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर आजही प्रचंड चर्चेत असतात. अनेकांना त्यांच्या हँडसम आणि इतकं तरुण दिसण्या मागचं गुपित कळत नाही. नुकतंच आजोबा बनलेले अनिल आजही प्रचंड सक्रिय असतात. विविध कार्यक्रम आणि रिऍलिटी शोमध्ये ते धम्माल करतांना दिसून येतात. तसेच ते सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असतात. सतत ते आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत नव्या-जुन्या अपडेट्स शेअर करत असतात.
हे वाचा : तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर सावधान, चुकूनही या 5 चुका करू नका!
आजही अनिल कपूर यांनी एक आठवण शेअर केली आहे, जी प्रत्येक व्यक्तीच लक्ष वेधून घेत आहे. अनिल कपूर यांनी मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते (actors) लक्ष्मीकांत बेर्डेसोबतचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्याने मराठी भाषादिनानिमित्त हि आठवण शेअर केली आहे. पाहूया त्यांनी पोस्टमध्ये नेमकं काय लिहलंय.
मराठी भाषा दिनानिमित्त अनिल कपूर यांनी लक्ष्मीकांत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलेलं, ‘महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. या दिनानिमित्त मला एका गोष्टीची आवर्जून आठवण येते, ती आठवण म्हणजे माझा मराठीतील एकुलता एक सिनेमा ‘हमाल दे धमाल’ होय.
मी माझं सौभाग्य समजतो की, मला या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिने कारकिर्दीतील सर्वोत्तम परफॉर्मन्सपैकी एक परफॉर्मन्स पाहता आला. माझा मित्र लक्ष्मीकांत बेर्डेची मला रोजच आठवण येते’. असं म्हणत अभिनेत्याने आपलं मन मोकळं केलं आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे (actors) आणि अनिल कपूर यांनी ‘हमाल दे धमाल’ या मराठी सिनेमात एकत्र काम केलेलं. या चित्रपटात अनिलने पाहुण्या कलाकाराची परंतु महत्वाची भूमिका साकारली होती. लक्ष्मीकांत यांच्या जोडीला चित्रपटात वर्षा उसगांवकर होत्या. तसेच निळू फुलेसारखे दिग्गज कलाकारही होते. हा सिनेमा चांगलाच हिट ठरला होता.