अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमधे सर्वांसाठी हिरो होता.
(Actress) रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती. पुष्पाच्या दुसऱ्या पार्टबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे.लाल चंदनाचा व्यवसाय करणाऱ्या पुष्पा आणि त्याला अडवणाऱ्या भवर सिंहची गोष्ट आता पुढे सरकारणार आहे.
पहिल्या पार्टच्या शेवटीच याचा दुसरा पार्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले असून, यामध्ये आता रश्मीकाची जागा अभिनेत्री ‘साई पल्लवी’ने घेतली आहे. या अभिनेत्रीने होळीच्या मुहूर्तावर शूटिंगलाही सुरुवात केल्याचं कळतंय. त्यामुळे या चित्रपटाच्या आगामी भागात आता प्रेक्षकांना अल्लू अर्जुन आणि साई पल्लवीची जोडी पाहायला मिळणार आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती : अजित पवार
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2’ मध्ये साई एका आदिवासी (Actress) मुलीची भूमिका साकारणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका आणि साई पल्लवी हे त्रिकोण जेव्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसेल, तेव्हा प्रेक्षकांचीही उत्सुकता ताणली गेली असेल. चित्रपटाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुनच्या रावडी लूकवर चाहते आधीच फिदा आहेत. त्यात रश्मीकाने त्यात बोल्डचा तडका लगावला होता त्यानंतर आता ‘साई पल्लवी’ची यात एंट्री झाली तर चित्रपटात आणखी धमाल येणार हे नक्की.