Saturday, June 21, 2025

आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

रविवारी वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं. आकांक्षाने तिचं आयुष्य का संपवलं असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. कमी वयात तिने फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं.

यादरम्यान आता एका अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर (social media) चर्चेत आली आहे. ‘तुझी भीती खरी ठरली’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. यासोबतच आकांक्षाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. काजल राघवानी असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. त्यामुळे काजलला आकांक्षाच्या आत्महत्येमागील कारण माहीत होतं का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे वाचा : जे जिओला जमलं नाही ते एअरटेलनं करून दाखवलं

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येमुळे भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीला मोठा धक्का बसला. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित  तिने भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आज तुझी भीती खरी ठरली आणि तू तुझ्या शौर्यासमोर तू भीतीला जिंकू दिलंस. दुसऱ्या शूटिंगला (social media) जाण्यापूर्वी तू तुझ्या भावना सर्वांसोबत शेअर केल्या होत्या’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

पुढे तिने लिहिलं, ‘ज्या गोष्टीची भीती होती, तुला ज्या गोष्टीची चिंता होती.. आता कदाचित ती होणार नाही. त्यामुळे आता जिथे कुठे असशील तिथे धाडसाने राहा आणि आपल्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण कर. तुला इथे जो आनंद मिळाला नाही, तो सर्व तुला मिळू दे. पण जे काही असेल, मी यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही की तू स्वत:चं आयुष्य संपवू शकतेस. बाकी देव आहे आणि तुझ्या जिवाची किंमत आज नाही तर उद्या ते नक्कीच चुकवतील.’

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म