आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL) अवघे काही तास शिल्लक असताना चेन्नईच्या अडचणीत वाढ झाली आहे. चेन्नईचा ऑलराऊंडर खेळाडू मोईन अलीनंतर आणखी एक स्टार खेळाडू हा या मोसमातील पहिल्या टप्प्यातून बाहेर झाला आहे. या खेळाडूने गेल्या मोसमात चेन्नईला आपल्या कामगिरीच्या जोरावर चॅम्पियन बनवलं होतं.
चेन्नई आयपीएलच्या 14 व्या मोसमातील चॅम्पियन टीम होती. चेन्नईला आयपीएल विनर बनवण्यात दीपक चाहरने निर्णायक आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता याच दीपकला या 15 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील सामन्यांना मुकावं लागणार आहे. त्यामुळे चेन्नईसाठी हा मोठा झटका आहे.
हे वाचा : health : Corona चा नवा घातक व्हायरस महाराष्ट्रात आल्याची शक्यता, इतके रुग्ण निरीक्षणाखाली
नक्की कारण काय?
चाहरला वेस्ट इंडिज विरुद्ध कोलकाता येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुखापत झाली होती. या दुखापतीतून दीपक अजून सावरलेला नाही. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
“चाहरला अद्याप बीसीसीआयकडून फिटनेसबाबत मंजूरी मिळालेली नाही. तसेच चाहरला जोवर बीसीसीआय पूर्णपणे फिट असल्याचं जाहीर करत नाही, तोवर तो बंगळुरुतील एनसीए राहिल”, अशी माहिती विश्वनाथन यांनी दिली. (IPL) चेन्नईने दीपकला 14 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.
दीपकने चेन्नईला गत मोसमात चॅम्पियन बनवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. दीपकने या 14 व्या हंगामातील 15 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या. दीपक चेन्नईला निर्णायक आणि जेव्हा विकेट हवी असेल तेव्हा ती मिळवून द्यायचा. मात्र आता त्याला पहिल्या टप्प्याला मुकावं लागलं आहे. यामुळे आता धोनी एन्ड कंपनीला पहिल्या टप्प्यात दीपकची उणीव भासणार आहे.