बिग बॉस (Big Boss) मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम हा खूपच लोकप्रिय झाला आहे. बिग बॉस कार्यक्रमात असताना विशाल महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी त्यानं प्रेक्षकांना एक वचन दिलं होतं. हे वचन होतं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं.
हे वचन पूर्ण करण्यासाठी विशालनं एक पाऊल टाकलं आहे. लवकरच विशाल कलर्स मराठीवरील ‘ आई मायेचं कवच’ मालिकेत दिसणार आहे. या त्याच्या नव्या भूमिकेसंदर्भात विशालनं इ्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामधून त्यानं प्रेक्षकांना एक आवाहन केलं आहे.
काय आहे विशालची पोस्ट?
बिग बॉस (Big Boss) मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये विजेता ठरलेल्या विशाल निकमला खूपच लोकप्रियता मिळाली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. कार्यक्रमात असताना विशालनं प्रेक्षकांना १०० टक्के मनोरंजन करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार विशाल लवकरच ‘आई मायेचं कवच’ मालिकेत दिसणार आहे. या संदर्भात विशालनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
विशालनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘जसं मी म्हटलं होतं बिग बॉसनंतर तुम्हा सर्वांचं मनोरंजन कसं करता येईल याकडे माझा कल असेल आणि त्यासाठी माझे १००% प्रयत्न असतील. तुमचं मनोरंजन करण्यासाठी ‘मानसिंग’ ही भूमिका म्हणजे मी उचललेलं पहिलं पाऊल आहे,अजून बरीच वाटचाल करायची आहे.
त्यासाठी तुम्ही आजवर केलेलं प्रेम असंच माझ्या या नव्या भूमिकेवरही कराल अशी आशा आहे. चला तर मग भेटूयात रोज रात्री १० वाजता ‘आई मायेचं कवच’ मालिकेत फक्त आपल्या कलर्स मराठीवर!’ विशालनं शेअर केलेल्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.