टायटॅनिक जहाज कुणाला माहिती नाही. अगदीच नाही तर टायटॅनिक (Titanic ) फिल्म तुम्ही पाहिलीच असेल. त्यामुळे या जहाजाबद्दल नक्कीच माहिती असेल. टायटॅनिक जहाजाबाबत किती तरी गोष्टी तुम्ही पाहिली, ऐकल्या, वाचल्या असतील.
असे कित्येक किस्से, दावे कानावर पडत असतात. त्यामुळे याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लोकांमध्ये असते. आता टायटॅनिक बुडाल्याच्या तब्बल 111 वर्षांनंतर मोठी बातमी समोर आली आहे. टायटॅनिक बुडण्याचं रहस्य अद्यापही रहस्यच आहे.
त्यामुळे याबाबत अद्यापही शोध सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अशाच एका शोधात एकूण सात लाख छायाचित्रे घेण्यात आली आणि त्यापासून संपूर्ण जागेचे स्कॅनिंग करण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार टायटॅनिक (Titanic ) जहाजाच्या अवशेषातून एक मौल्यवान वस्तू सापडली आहे. ही वस्तू म्हणजे सोन्याचा हार आहे.
या नेकलेसची खास गोष्ट म्हणजे हा हार दुर्मिळ शार्क माशाच्या दातांपासून बनवला गेला आहे. टायटॅनिकच्या अवशेषांचे छायाचित्रे पाण्याखालील स्कॅनिंगच्या माध्यमातून टिपण्यात आले होते, तेव्हा हा हार सापडल्याचे सांगण्यात आले.रिपोर्टनुसार, हा सोन्याचा हार मेगाडॉन नावाच्या शार्कच्या दातापासून बनवण्यात आला होता. हा एक दुर्मिळ मासा होता, जो आता जवळजवळ नामशेष झाला आहे.
हे वाचा : धोनीला का आणि कोणासाठी आणखी एक वर्ष का खेळायचे आहे? सांगितले भावनिक कारण…
या प्रकल्पाच्या चित्रांमध्ये हा दात स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकल्पाचे अधिकारी रिचर्ड पार्किन्सन यांनी हा शोध सुंदर आणि धक्कादायक असल्याचं सांगितलं आहे. पण ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारामुळे हा हार त्या ढिगाऱ्यातून काढता येणार नाही. पण आर्टिफिशिअल इंटिलेजन्सच्या मदतीने या नेकलेसचा खरा मालक कोण आहेत, या शोध घेतला जाणार आहे.
10 एप्रिल 1912 रोजी हे जहाज ब्रिटनमधील साउथहॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्क, अमेरिकेसाठी निघाले तेव्हा उत्तर अटलांटिक महासागरातील एका मोठ्या बर्फाच्या खडकाशी आदळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात टायटॅनिक बुडालेंआणि दीड हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या जहाजाला अजूनही पूर्णपणे पाण्यातून बाहेर काढलं गेलेलं नाही.