Saturday, June 21, 2025

Bollywood : सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोलिसांच्या हाती लागली ‘ती’ गोष्ट

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं बुधवारी आकस्मिक निधन झालं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांचे चाहते आणि संपूर्ण इंडस्ट्रीला अजूनही धक्का बसला आहे. सतीश कौशिक आपल्या दमदार अभिनयामुळे आणि चित्रपटांमुळे चाहत्यांच्या मनात नेहमीच जिवंत राहतील. दरम्यान सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

9 मार्च रोजी सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. कार्डियॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं होतं. परंतु आता या प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसून येत आहे. आज तकच्या वृत्तानुसार या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

या रिपोर्ट्सनुसार, मृत्यूच्या एकदिवस आधी दिल्लीच्या ज्या फार्म हाऊसमध्ये सतीश यांनी होळी खेळली होती, त्याठिकाणी पोलिसांना काही औषधे आढळून आली आहेत. यामध्ये दररोजच्या औषधांसोबत काही वेगळी औषधेही आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता या गोष्टीचा तपास सुरु केला आहे.

हे वाचा : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना अद्याप या प्रकरणात काहीही संशयास्पद असं आढळलेलं नाहीय. (Bollywood) सतीश कौशिक यांच्या रक्त आणि हृदयाचा डिटेल रिपोर्ट 15 दिवसांच्या आत पोलिसांच्या हाती येईल. तत्पूर्वी पोलीस अतिशय सावधानीने पाऊले उचलत आहेत.

अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, 1972 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली होती. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी थियेटरमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

सतीश कौशिक यांनी प्रामुख्याने एक विनोदी अभिनेता अशी आपली छाप पाडली होती. गोविंदासोबत त्यांनी अनेक विनोदी सिनेमे केले आहेत. त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय होती. 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1993 मध्ये त्यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाद्वारे (Bollywood) दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. सतीश कौशिक हे उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक असण्यासोबतच एक पटकथा लेखकदेखील होते.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म