Saturday, April 19, 2025

Cricket : गूड न्यूज! IPL 2022 सुरु होण्यापूर्वीच BCCI कडून चाहत्यांना मोठं गिफ्ट

क्रिकेटमध्ये (Cricket) सर्वात लोकप्रिय लीग म्हणजे आयपीएल. येत्या 26 मार्चपासून पुन्हा एकदा आयपीएसचा डंका वाजणार आहे. कोरोनाच्या काळातंही यावेळी आयपीएल भारतात खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनसाठी फॅन्स उत्सुक आहेतच. अशातच बीसीसीआयने चाहत्यांना अजून एक गूड न्यूड दिली आहे.

बीसीसीआयकडून चाहत्यांना मोठं गिफ्ट

मुंबईमध्ये शनिवारपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आणि मुख्य म्हणजे यावर्षी आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल चाहते स्टेडियममध्ये येऊन पाहू शकणार आहेत.

आयोजकांनी बुधवार सांगितलं की, स्टेडियममध्ये एकूण 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. चाहत्यांसाठी ही गोष्ट कोणत्या गिफ्टपेक्षा कमी नाहीये. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये गतविजेचे चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढत होणार आहे.

आयपीएल मध्ये होणार 74 सामने

आयपीएलचा (Cricket) 15 वा सिझन मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील स्टेडियममध्ये होणार आहे. यावेळी कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार स्टेडियमच्या क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना सामना बघता येणार आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन टीम्सचा समावेश झाल्यानंतर या सिझनमध्ये एकूण 74 सामने होणार आहेत.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म